Join us

दीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 11:16 IST

गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे.

ठळक मुद्देदीपिका तूर्तास पती रणवीर सिंगसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. याच ठिकाणी दोघांनी नववर्षाचे स्वागत केले. लवकरच दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवाल हिचे बायोपिक आहे.

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. आपल्या प्रत्येक चित्रपटात ती वेगवेगळ्या भूमिकेत दिसली. गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत, दीपिकाने एका खास महिलेच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. होय, तुला मनापासून कुणाचे बायोपिक करायला आवडेल, असा प्रश्न तिला केला गेला. यावर दीपिकाने कुणाचे नाव घ्यावे? तर प्रिन्सेस डायनाचे.

 ‘ प्रिन्सेस डायनाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. आजही मी तिचे व्हिडिओ बघत असते. लोक केवळ तिला भेटायला, तिच्याशी बोलायला येत. त्यावेळी ती लोकांशी कशी भेटत असे, कशी बोलत असे, हे सगळे मी नोट करते. डायनाच्या निधनाची बातमी माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी कधीच इतके रडले नव्हेत, जेव्हा तिच्या निधनाची बातमी ऐकून रडले. तिच्यात व माझ्यात एक विचित्र कनेक्शन आहे. मी तिला कधीच भेटले नाही. पण मी तिला खूप चांगल्याप्रकारे ओळखते, असेच मला वाटते. त्यामुळे लेडी डायनाचे बायोपिक करायची संधी मिळाली तर मी मुळीच सोडणार नाही, असे दीपिका म्हणाली. प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल-फाएद यांचा १९९७ साली एका कार अपघातात मृत्यू झाला होता. हा एक निव्वळ अपघात होता की यामागे काही घातपात होता, यावर अजूनही चर्चा सुरू आहे. 

दीपिका तूर्तास पती रणवीर सिंगसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. याच ठिकाणी दोघांनी नववर्षाचे स्वागत केले. लवकरच दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवाल हिचे बायोपिक आहे. यात दीपिका लक्ष्मीची भूमिका वठवताना दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग