Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 17:24 IST

नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे.

ठळक मुद्देसध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत राजस्थानात सुट्टी एन्जॉय करतेय. रणबीर कपूर, आलिया भटही तिच्यासोबत आहेत.

2020च्या अखेरच्या दिवशी दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर इतकेच नाही तर फेसबुक पूर्णपणे खाली केले.  होय, या सर्व अकाऊंटवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट तिने डिलीट केल्या. दीपिकाचे सोशल अकाऊंट अचानक अशापद्धतीने खाली झालेले पाहूनच साहजिकच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण आता नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे.दीपिकाने ऑडिओ डायरी नावाने पहिला संदेश शेअर करत चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हे 1 जानेवारी 2021 आहे, सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा,’ असे ही ऑडिओ डायरी शेअर करताना तिने लिहिले आहे.

आपल्या संदेशात ती म्हणते, ‘माझ्या ऑडिओ डायरीत तुम्हा सर्वांचे स्वागत. माझ्या भावना आणि विचारांचा रेकॉर्ड आहे. 2020 हे सर्व सर्वांसाठी अनिश्चिततेचे वर्ष होते. 2021 या वर्षासाठी मी माझ्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांना सुदृढ आरोग्य व आनंद लाभो, हॅपी न्यू ईअर.’ 

दीपिकाने जुन्या सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता.  इन्स्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही हजारो लोक तिला फॉलो करतात, मग अचानक दीपिकाने सगळ्या पोस्ट का डिलीट केल्यात? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क काढले गेले होते. काहींनी दीपिकाचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज बांधला होता, तर काहींना हा प्रमोशन फंडा असल्याचे म्हटले होते.

मात्र आता एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे दीपिकाचे अकाऊंट हॅक वगैरे झाले नव्हते, तर तिने स्वत: सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. कदाचित याच ऑडिओ डायरीची सुरुवात करण्यासाठी.सध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत राजस्थानात सुट्टी एन्जॉय करतेय. रणबीर कपूर, आलिया भटही तिच्यासोबत आहेत.

Ohh No...!! दीपिका पादुकोणने इस्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट; ट्विटर, फेसबुकही झाले खाली

टॅग्स :दीपिका पादुकोणनववर्ष