Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूड सिनेमातून बाहेर झाल्याच्या चर्चा, दीपिका पादुकोणने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:32 IST

गेल्या काही दिवसांत दीपिका पादुकोणच्या हातून अनेक सिनेमे निसटले

बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी बिग बजेट चित्रपटांमुळे सतत चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती एका वेगळ्या कारणामुळे प्रकाशझोतात आली होती. हॉलिवूडची प्रसिद्ध वेब सीरिज 'द व्हाईट लोटस'च्या चौथ्या सीझनमध्ये दीपिका झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अचानक ती या सीरिजमधून बाहेर पडल्याची बातमी समोर आल्याने चाहते चकित झाले.

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने सोशल मीडियावर एक 'क्रिप्टिक पोस्ट' शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये शांत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले असून, 'शांत राहणे हीच सर्वात मोठी ताकद आहे' असे म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी याचे वेगवेगळे अर्थ लावत आहेत.

दीपिकाने एक नोट रिपोस्ट केली आहे. त्यात असे  लिहिले आहे की, "राग व्यक्त करणे किंवा आरडाओरडा करून प्रतिक्रिया देणे खूप सोपे आहे, त्यासाठी कोणत्याही शक्तीची गरज नसते. पण खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुमच्या सभोवताली गोंधळ सुरू असतो आणि तरीही तुम्ही डगमगत नाही. जेव्हा ड्रामा तुम्हाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहणे हीच खरी परीक्षा असते." भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मेहनत लागते, असेही तिने यात नमूद केले आहे.

वर्कफ्रंट 

दीपिका 'द व्हाईट लोटस'मुळे चर्चेत असली तरी तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'AA22' या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. सप्टेंबरमध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला. सध्या ती लेकीच्याही संगोपनात व्यग्र आहे. यानंतर आता एकामागून एक मोठ्या चित्रपटांसह दीपिका पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Deepika Padukone's cryptic post after Hollywood exit rumors surface.

Web Summary : Amidst rumors of exiting 'The White Lotus', Deepika Padukone shared a cryptic post emphasizing the power of staying calm. She has projects like 'King' and 'AA22' lined up after maternity leave.
टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड