Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण करतेय होमवर्क, विश्वास बसत नाही तर 'हा' घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:29 IST

दीपिका पादुकोण एकामागून एक हिट सिनेमा दिल्यानंतर आता एका खास स्क्रिप्टवर काम करतेय. दीपिका सध्या तिचा आगामी सिनेमा छपाकच्या तयारीमध्ये बिझी आहे.

ठळक मुद्देसिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लुक आऊटदेखील झाला आहेदीपिका पादुकोण या सिनेमाला घेऊन खूपच उत्साही आहे

दीपिका पादुकोण एकामागून एक हिट सिनेमा दिल्यानंतर आता एका खास स्क्रिप्टवर काम करतेय. तुम्हाला कळलेच असेल आम्ही नेमकं कशाबदल बोलतोय, दीपिका सध्या तिचा आगामी सिनेमा छपाकच्या तयारीमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका निर्मिती क्षेत्रात काम करतेय. या सिनेमाची दिग्दर्शन मेघना गुलजार करतेय. या सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लुक आऊटदेखील झाला आहे. 

 दीपिका पादुकोण या सिनेमाला घेऊन खूपच उत्साही आहे. डॅपीने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो छपाकच्या स्क्रिप्टबरोबर शेअर केला आहे. या फोटोला दीपिकाने कॅप्शन देखील दिले आहे. ''मी खुश आहे कारण माझ्याकडे एकच होमवर्क.''     

छपाक सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.

सध्या या सिनेमाचे शूटिंग दीपिका दिल्लीत करतेय. दीपिकाचे फॅन्सच नव्हे तर बॉलिवूडमधील सगळेच कलाकार या चित्रपटाच्या पहिल्या लूकचे कौतुक करत आहेत. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोण