Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video:  दीपिकाला आवडला चाहत्याचा मोबाईल; म्हणे, मी हा वापरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 14:52 IST

व्हिडीओ व्हायरल..

ठळक मुद्दे‘83’ या सिनेमातही दीपिका दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या ‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच या चित्रपटाच्या  प्रमोशनल इव्हेंटसाठी दीपिका एका पंचतारांकित हॉटेलात पोहोचली. साहजिकच दीपिका येणार म्हटल्यावर चाहत्यांनी आणि मीडियाच्या फोटोग्राफर्सनी गर्दी केली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत दीपिकाच्या हातात एका चाहत्याचा फोन दिसतोय. फोन हातात घेत, दीपिका त्या चाहत्याशी बोलतेय. काय मी हा वापरू, असे ती त्या चाहत्याला म्हणते. यावर  हो, ठेव तुझ्याकडे . तसाही 10 ला तुझा वाढदिवस आहे, तेव्हा ठेव, असे हा चाहता तिला म्हणतो. यावर दीपिका हसत आणि त्याला त्याचा फोन परत करते. शिवाय माझा वाढदिवस 5 जानेवारीला आहे, असेही त्याला सांगते. 

दीपिकाचा या व्हिडीओतील अंदाज चाहत्यांना पसंत पडतोय. दीपिका सर्रास, चाहते व फोटोग्राफर्सची मजा घेताना दिसते. ‘छपाक’बद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

या ट्रेलरनंतर लोकांनी दीपिकाच्या कामाचे कौतुक केले. या चित्रपटात दीपिकाशिवाय या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी   प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. याशिवाय ‘83’ या सिनेमातही दीपिका दिसणार आहे. यात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण