Join us

'स्पिरिट' सिनेमातून काढल्याचा राग, दीपिकाने स्क्रिप्ट केली लीक? संदीप वांगा रेड्डीचे आरोप, म्हणाले- "पुढच्या वेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:36 IST

तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे.

प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्पिरिट' या सिनेमातून दीपिका पादुकोणला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. संदीप वांगा यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. पण, यात त्यांनी दीपिकाचं नाव न घेता अभिनेत्रीला खडे बोल सुनावले आहेत. 

ट्वीटमध्ये काय म्हणाले संदीप वांगा रेड्डी? 

जेव्हा मी एखाद्या कलाकाराला सिनेमाची स्क्रिप्ट सांगतो, तेव्हा मी त्याच्यावर १०० टक्के विश्वास ठेवतो. आमच्यामध्ये NDA(Non Disclosure Agreement) तसा करार झालेला असतो. पण, हे करून तू कोणत्या पद्धतीची व्यक्ती आहेस, हे दाखवून दिलं आहेस. ज्युनियर आर्टिस्टचा अपमान करणं आणि स्टोरी लीक करणं...हेच तुझं फेमिनिझम आहे का? 

एक फिल्ममेकर म्हणून मी यामागे अनेक वर्ष घालवली आहेत. फिल्ममेकिंग माझ्यासाठी सर्वकाही आहे. हे तुला समजलं नाही आणि कधी समजणारही नाही. पुढच्या वेळी सगळी स्टोरी सांगून टाक. कारण मला काहीच फरक पडत नाही. खुंदक में बिल्ली खंबा नोचे...

संदीप वांगा रेड्डी यांनी 'स्पिरिट' सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची निवड केली होती. मात्र दीपिकाने खूप जास्त मानधन मागितल्याने अभिनेत्रीला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तिच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळेच वांगा यांनी तिला सिनेमातून बाहेर काढल्याचंही बोललं जात आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटी