Join us

Pathaan Movie : 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:41 IST

पहिले गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून गोल्डन मोनोकिनी मध्ये दीपिकाचा 'हॉट लुक' समोर आाला आहे. 

शाहरुख खान (Shahrukh Khan), दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम(John Abraham) यांच्या पठाण सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. सिनेमाच्या पोस्टरला तर भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता याचे पहिले गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून गोल्डन मोनोकिनी मध्ये दीपिकाचा 'हॉट लुक' समोर आाला आहे. 

'बेशरम रंग' लवकरच रिलीज होणार

'पठाण'चं 'बेशरम रंग' हे पहिलं गाणं १२ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. पोस्टरवर दीपिकाचा लुक बघुन चाहते खुपच इंप्रेस झालेत. 'गोल्डन मोनोकिनी'मध्ये तिचा हा बीच साईड फोटो बघुन तुमची नजरच हटणार नाही. 'बेशरम रंग का वक्त आ गया है' असे कॅप्शन देत पठाणच्या टीमने गाणं लवकरच रिलीज करण्याची घोषणा केली आहे. 

Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

'पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणशाहरुख खानजॉन अब्राहमसंगीत