Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 14:11 IST

सोशल मीडियावरही लोकप्रियतेच्याबाबतीत दीपिकाने बॉलिवूडमध्ये सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत नंबर वन सेलिब्रेटी बनली आहे.

बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिचे चर्चेत असणे काही वेगळे नाही. मात्र आता दीपिकाची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे होत आहे.  सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियताही अधिक वाढू लागते. असेच काहीसे दीपिकासह घडले आहे. सोशल मीडियावरही लोकप्रियतेच्याबाबतीत दीपिकाने बॉलिवूडमध्ये सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत नंबर वन सेलिब्रेटी बनली आहे. 

इन्स्टाग्रामवर  50 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. नक्कीच हा आकडा पाहून दीपिकाही भारावली असणार. दीपिकाने फॉलोअर्सच्या बाबतीत सोशल मीडिया अकाउंटवर सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनाही मागे टाकले आहे.  इंस्टाग्राम अकाऊंटवर  50 मिलियन  फॉलोअर्स असणा-या सेलिब्रेटींच्या यादीत दीपिका भारतात दुसर्‍या क्रमांकावर आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.  त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींपेक्षाही जास्त दीपिकाचाच बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून दीपिका सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या लॉकडाऊन अॅक्टीव्ही आणि फोटोंमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत  आहे. तिच्या चाहत्यांमध्ये तरूण वर्गाची संख्या जास्त आहे. तसेच तिच्या पोस्टरवच्या प्रतिक्रिया पाहता येत्या काही काळाता दीपिकाची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग