Join us

Om Shanti Om: एका सिनेमासाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:29 IST

आज ती प्रत्येक चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये घेते, परंतु ओम शांती ओम या पहिल्या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले होते हे तुम्हाला माहिती आहे का?

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या लीडिंग लेडीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात करणारी दीपिका आज बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. अर्थात हा पल्ला गाठण्यासाठी तिला बराच मोठा संघर्ष करावा लागला.दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून डेब्यू केला होता. 2007 साली रिलीज झालेला हा तिचा पहिला सिनेमा होता.

गेल्या 14 वर्षात तिने तिच्या चाहत्यांना अनेक अप्रतिम चित्रपट दिले आणि हेच कारण आहे की आज ती प्रत्येक चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये घेते, परंतु ओम शांती ओम या पहिल्या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले होते हे तुम्हाला माहिती आहे का? हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता आणि त्यात दीपिकाच्या सोबत शाहरुख खान होता, त्यामुळे दीपिका पादुकोणसाठी ही ऑफर माइलस्टोन ठरला. 

तिला.पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडच्या किंगसोबत काम करण्याची संधी मिळत होती आणि हा चित्रपटही खूप गाजला होता. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एवढा हिट चित्रपट देऊनही दीपिका पादुकोणने या भूमिकेसाठी कोणतीही मानधन घेतलं नव्हतं. आज दीपिका एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेते आहे. ती फक्त तेच चित्रपट साइन करते ज्यात तिची भूमिका खूप मजबूत किंवा खूप खास असते. दीपिका एका सिनेमासाठी 15-16 कोटी घेते. याशिवाय दीपिका जाहिरातींमधूनही मोठी कमाई करते. रिपोर्टनुसार, दीपिका जाहिरातीसाठी प्रत्येक ब्रँडकडून सुमारे 8 कोटी रुपये घेते.

दीपिका पादुकोणने मुंबईतला फ्लॉट 16 कोटी रुपयांना खरेदी केला होता.दीपिका पदुकोणच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक महागड्या आणि आलिशान कारचा समावेश आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोण