Join us

दीपिका पादुकोणने केलं कन्फर्म, 'पठाण' मधून सिल्वर स्क्रिनवर परतणार शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 16:10 IST

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली जाते आहे.

सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी 'पठाण' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री करणार आहे.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबतदीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  शाहरुख आणि निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा केलेली नसली तरी शाहरुख खानच्यासमवेत पठाण या चित्रपटात ती दिसणार असल्याचे दीपिकाने कन्फर्म केले आहे.

फेमिनाला दिलेल्या मुलाखती दरम्यान दीपिका पादुकोण  तिच्या आगामी सिनेमाविषयी बोलली. दीपिका म्हणाली, “मी चित्रपट शकुलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.  ही एक नात्याची अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत आपण भारतीय सिनेमात पाहिली नाही.  यानंतर मी अ‍ॅक्शन चित्रपट ‘पठाण’ आणि नंतर प्रभास बरोबर  नाग अश्निवीच्या बहुभाषिक सिनेमात काम करत आहे.

दीपिका पादुकोण पुढे म्हणाली, "नवीन आणि जुन्या पिढी एकत्र येत आहेत तेव्हा मी अ‍ॅनी हॅथवेच्या 'द इंटर्न' या चित्रपटात काम करत आहे.  त्यानंतर महाभारत या कथेत मी द्रौपदीची भूमिका साकारत आहे.  मला ही  गोष्ट जगाला सांगायची आहे.

 शाहरुख खानचा शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता.  या चित्रपटात शाहरुखबरोबर कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.  यानंतर शाहरुख खान दोन वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिला.  पण आता तो पठाण या सिनेमातून नवी सुरुवात करणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणशाहरुख खान