Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण बनली देशाची नंबर वन फिमेल ब्रँड; इतकी आहे ब्रँड व्हॅल्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 10:48 IST

होय, सध्या भारताची सर्वात मोठी सेलिब्रिटी ब्रँड दीपिका पादुकोण आहे आणि तिच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याचे नाव आहे.

ठळक मुद्देसध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे.  ‘छपाक’ या चित्रपटात ती अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या भारतातील सर्वात मोठा सेलिब्रिटी ब्रँड कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारालच तर या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही गोंधळू शकता.  कारण शाहरूख खान, सलमान खान वा आमिर खान यापैकी कुणीच आता नंबर वन राहिलेले नाही. होय, सध्या भारताची सर्वात मोठी सेलिब्रिटी ब्रँड  दीपिका पादुकोण आहे आणि तिच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याचे नाव आहे.सेलिब्रिटी ब्रँडच्या ब्रँड व्हॅल्यूवर लक्ष ठेवणारी डफ आणि फेल्पस या कंपन्यांची ताजी आकडेवारी बघता, दीपिका पादुकोणची ब्रँड  व्हॅल्यू १० कोटी डॉलर म्हणजे ७०० कोटी रूपयांवर पोहोचली आहे. सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत दीपिकाची गतवर्षीची कमाई ११३ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत दीपिकाने क्रिकेटपटू एमएस धोनी, अभिनेता आमिर खान आणि पती रणवीर सिंग अशा सगळ्यांना मागे टाकले आहे.

गतवर्षांत दीपिकाने वेगवेगळ्या २१ उत्पादनांची ब्रँड अ‍ॅम्बिसीडर म्हणून काम केले. इतक्या उत्पादनांची जाहिरात करणारा दुसरा कुठलाही फिल्मी अभिनेता वा अभिनेत्री नाही. केवळ क्रिकेटपटू विराट कोहली तिच्या जवळपास पोहोचू शकतो.

आपल्या वाढत्या ब्रँड  व्हॅल्यूसोबत दीपिकाने आता स्टार्स अप्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर दीपिकाने आता ड्रम फूड्स इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड  या सुप्रसिद्ध फ्रेंच कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी एपिगेमिया हा योगर्ट ब्रँड  चालवते.

सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे.  ‘छपाक’ या चित्रपटात ती अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छपाक’  मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार हा चित्रपट दिग्दर्शित करतेय.

टॅग्स :दीपिका पादुकोण