Join us

दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 15:02 IST

Deepika Padukone : दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आता दीपिका नुकतीच ३ डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण भारतीय अभिनेत्रींच्या यादीतील टॉपची अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये बऱ्याच हिट सिनेमात काम केले आहे. याशिवाय हॉलिवूडमध्येही तिने आपल्या कामाची छाप उमटवली आहे. तिने अनेकदा भारताचं नाव रोषण केलं आहे. दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आता दीपिका नुकतीच ३ डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका पादुकोणने ऑस्करमध्ये भारतीय गाणे सादर करण्यासाठी स्टेजवर पाऊल टाकून इतिहास रचला होता, तर आता २०२३ वर्षाच्या अखेरीस तिने असे काही केले आहे जे आजपर्यंतची सर्वात मोठी आणि विशेष कामगिरी आहे. खरेतर, दीपिकाने नुकतेच '२०२३ अकादमी म्युझियम गाला' कार्यक्रमात भाग घेतला होता, त्यानंतर दीपिका या कार्यक्रमात सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. यावेळी ती निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 

वर्षाच्या सुरूवातीला, अभिनेत्रीने ऑस्कर आणि आता ऑस्‍करनंतर दुसऱ्या जागतिक इव्हेंटमध्ये हजेरी लावून देशाचे नाव उंचावले आहे. अकादमी म्युझियम गाला हा ऑस्करनंतरचा जगातील दुसरा सर्वात मोठा कार्यक्रम आहे जो त्याच मंडळाद्वारे आयोजित केला जातो.

दीपिकानेही हे यश केले आपल्या नावावर इतकेच नाही तर यावर्षी रिलीज झालेल्या दीपिकाच्या पठाण या चित्रपटाने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करून अनेक विक्रम मोडले आहेत. यानंतर अभिनेत्रीने टाइन मासिकाच्या मुखपृष्ठावरही आपले स्थान निर्माण केले. अभिनेत्रीच्या या कामगिरीने तिचे चाहते खूप खूश आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत पठाणमध्ये दिसली होती. आता ती हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण