Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर व दीपिकाने माझ्यावर ‘हल्ला’ केला! ‘तो’ व्हिडिओ शूट करणाऱ्‍या चाहतीचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 20:52 IST

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ‘सीक्रेट हॉलिडे’वर असल्याची बातमी आम्ही काही तासांपूर्वीच तुम्हाला दिली होती.

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ‘सीक्रेट हॉलिडे’वर असल्याची बातमी आम्ही काही तासांपूर्वीच तुम्हाला दिली होती. फ्लोरिडात रणवीर व दीपिका एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. खरे तर रणवीर व दीपिकाने अतिशय गुप्तता पाळून या सुटीचे प्लानिंग केले होते. पण फ्लोरिडाच्या रस्त्यांवर ते एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले आणि दोघांच्या ‘सीक्रेट हॉलिडे’चे पार बारा वाजलेत. काही उत्साही चाहत्यांनी रणवीर व दीपिकाचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडिओ व्हायरलही झालेत. पण हे व्हिडिओ शूट करताना एका चाहतीला रणवीर व दीपिकाच्या असभ्य वर्तणुकीचा अनुभव आला.

 

 

जैनाब खान नामक एका चाहतीने सोशल मीडियावर याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. ‘मी रणवीर व दीपिकाचा हा व्हिडिओ शूट करत असताना, दोघांनीही माझ्यावर ‘हल्ला’ केला. ते प्रचंड उद्धट़पणे वागलेत. आज त्यांनी एक चाहती आणि एका चाहतीच्या मनातील आदर दोन्ही गमावला. कदाचित यश आणि लोकप्रीयता त्यांच्या डोक्यात गेलीय. मी केवळ त्यांना फोटोसाठी विचारले होते आणि मी बरीच दूर असूनही दीपिका माझ्या अंगावर धावून आली. त्यांचे वर्तन असभ्य व उर्मटपणाचे होते,’ असे तिने लिहिले आहे.

जैनाबच्या या आरोपावर नेटक-यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सेलिब्रिटींनाही त्यांचे खासगी आयुष्य आहे. त्यांनी फोटो व व्हिडिओसाठी मनाई केली तर तो त्यांचा हक्क आहे. तुम्ही एखाद्याच्या परवानगीशिवाय कुणाचा व्हिडिओ कसा शूट करू शकता? असे काहींनी म्हटले आहे. याऊलट अनेकांनी जैनाबची बाजू उचलून धरली आहे.

कदाचित ते स्वत:ला प्रिन्स हॅरी अन् मेगन मार्कल समजू लागले असावेत, असे एका युजरने लिहिले आहे. काहींनी तर यानिमित्ताने दीपिका व रणवीरच्या कपड्यांवरही टीका केली आहे. रणवीर एखाद्या रस्त्यावरचा फेरीवाला दिसतोय, असे एका युजरने म्हटले आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण