Join us
Daily Top 2Weekly Top 5

Beyond Thrilled...! ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार बॉलिवूडची ‘मस्तानी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:42 IST

दीपिका पादुकोण आणि प्रभासचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

ठळक मुद्देयाचवर्षी सुरुवातीला दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.

दीपिका पादुकोण आणि प्रभासचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आपल्या नव्या सिनेमात बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार आहे. दीपिकाने एक व्हिडीओ शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा सिनेमा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.तेलुगू सिनेसृष्टीत दीपिकाचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक एस. एस. राजमौलींचा ‘बाहुबली’ केल्यानंतर प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, छपाक असे सिनेमे करणारी दीपिकाही यशाच्या शिखरावर आहे. आता हे दोन्ही सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या उत्कंठता वाढली आहे. इतकी की, दीपिका व प्रभासची नावे  सोशल मीडियावर ट्रेंड होत होते.  या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार असून हा सिनेमा साधारण 2022 मध्यें प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  

दिग्दर्शक नाग अश्विन दीपिकासोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहेत. ‘मी दीपिकासोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे. आजपर्यंत कुठल्याही नंबर 1 अभिनेत्री असे काही केले नसेल. तिची भूमिका सर्वांना हैराण करेल. दीपिका व प्रभासची जोडी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असेल. हा सिनेमा मोठ्ठा धमाका करेल, यात शंका नाही,’ असे त्यांनी लिहिले.

याचवर्षी सुरुवातीला दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. या सिनेमानंतर काही दिवस ब्रेक घेणार असल्याचे दीपिकाने सांगितले होते. आता मात्र दीपिका पुन्हा कामावर परतण्यास सज्ज झाली आहे. तिच्या व प्रभासच्या या सिनेमाची पे्रक्षकांना आतुरतेने प्रतीक्षा असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणप्रभास