Join us

Nani's clean shave look: 'क्लीन शेव' मधील नानी कधी पाहिलाय?  साऊथ सुपरस्टारनं अनेक वर्षानंतर बदलला लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:30 IST

Nani's clean shave look goes viral : लवकरच नानीचा Dasara हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण तूर्तास चर्चा या सिनेमाची नाही तर नानीच्या लुकची आहे...

Nani's clean shave look goes viral : नवीन बाबू घंटा, ज्याला चाहते नानी नावाने ओळखतात तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. नॅचरल स्टार म्हणूनही लोक त्याला ओळखतात. जर्सी या सिनेमात नानीनं साकारलेल्या भूमिकेचं अपार कौतुक झालं होतं. लवकरच त्याचा दासरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण तूर्तास चर्चा या सिनेमाची नाही तर नानीच्या लुकची आहे. होय, दासराचं शूटींग पूर्ण होताच, नानीने अचानक आपला लुक बदलला. नव्या लुकमधील एक फोटो नानीने शेअर केला आहे आणि त्याचा हा नवीन लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

नानीने नव्या लुकमधील एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. यात तो क्लीन शेव लुकमध्ये पाहायला मिळतोय. नानी बहुतांश दाढीत दिसतो. अशात त्याचा हा क्लीन शेव लुक पाहून चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

नानीच्या सिनेमाबद्दल सांगायचं तर दासरा एक पॅन इंडिया मुव्ही आहे. म्हणजेच तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम  आणि हिंदी भाषेत तो रिलीज होणार आहे. या चित्रपटात नानीसोबत कीर्ति सुरेश लीड रोलमध्ये आहे. येत्या ३० मार्चला हा सिनेमा रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे.

ॲक्टिंग दुनियेत येण्याआधी नानी एक आरजे होता. यानंतर वर्षभर त्याने नॉन स्टॉप नानी हा शो होस्ट केला. अनेक जाहिरातीत झळकला. याचदरम्यान दिग्दर्शक मोहन कृष्ण इंद्रगाती याची नजर त्याच्यावर पछली आणि त्यांनी नानीला पहिला ब्रेक दिला. अष्टा चम्मा हा त्याचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील नालीच्या अभिनयाचं जबरदस्त कौतुक झालं. यानंतर राइड हा त्याचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सिनेमानंतर नानीने कधीच मागे वळून बघितलं नाही.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी