Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या 'दंगल'मधील अभिनेत्रीला पितृशोक, म्हणाली - 'अल्लाह त्यांना माफ करेल..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 09:07 IST

आमिर खानच्या दंगल सिनेमात गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालंय (aamir khan, dangal, zaira wasim)

आमिर खानच्या 'दंगल' मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालंय. 'दंगल' मध्ये गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या झायरा वसीमला पितृशोक झालाय. झायराने इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केलीय. झायराने दोन सिनेमे करुन बॉलिवूडमधून संन्यास घेतला. तिच्या वडिलांचं निधन झाल्याने अनेकांनी तिचं सांत्वन करुन कमेंटमध्ये तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

झायरा वसीमने पोस्ट लिहून वडिलांना वाहिली श्रद्धांजली

झायराने इंन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून त्यात लिहिलंय की, "माझे वडील जाहिद वसीम यांचं निधन झालंय. मी सर्वांना विनंती करते की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्यांच्यावतीने अल्लाहची माफी मागा. माझ्या वडिलांच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्या अल्लाह माफ करेल. याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांना कोणत्याही शिक्षेपासून मुक्तता मिळो. जन्नतमध्ये त्यांना सर्वात चांगली जागा प्राप्त होवो."

झायराने घेतला बॉलिवूडमधून संन्यास

जम्मू काश्मिरमधील श्रीनगरमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री झायरा वसीमला ‘दंगल’  मधील गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका सााकारुन लोकप्रियता मिळाली. याशिवाय झायराने आमिर खानसोबत 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमातही काम केलं. परंतु पुढे ३० जून २०१९ ला झायराने अचानक बॉलिवूडमधून संन्यास घेतला. धार्मिक परंपरा आणि मान्यतांचं पालन करण्यासाठी झायराने बॉलिवूडमधून संन्यास घेतला, असं तिने सांगितलं.

 

टॅग्स :झायरा वसीमआमिर खानबॉलिवूड