Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमीर खान नंतर आता शाहरूख खानसोबत काम करणार ही दंगल गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:18 IST

शाहरूख खान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत.

ठळक मुद्देफातिमा सना शेख दिसणार शाहरूख खान सोबत

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा नुकताच 'झिरो' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूखने बव्वा सिंग या बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. आता शाहरूख भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत. या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी फातिमा सना शेखची वर्णी लागल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकरनंतर फातिमा सना शेखला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. ‘दंगल’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारख्या चित्रपटात फातिमाने काम केले असून फातिमाबरोबरच आणखीही अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात आहे.

नुकतेच फातिमाने एका मुलाखतीत शाहरूख सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले की, शाहरूख तिच्या आजूबाजूला असेल तर ती नर्वस होते. ती शाहरूखची खूप मोठी चाहती असून बऱ्याच कालावधीपासून त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. 

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी शाहरूख अमेरिकेला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. तिथे तो अंतराळवीरांसारखा विषम स्थितीत राहणार आहे. त्यामुळे तो या सिनेमातील भूमिका चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि अंतराळवीरांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे देखील समजेल. शाहरूख या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबरमध्ये सुरूवात करणार होता. मात्र आनंद एल. रॉय यांच्या 'झिरो' चित्रपटामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. तसेच राकेश शर्मा बायोपिकचे नाव आधी सॅल्यूट ठेवण्यात आले होते. मात्र नंतर हे शीर्षक बदलण्यात आले असून आता 'सारे जहाँ से अच्छा' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे करणार आहेत.

टॅग्स :शाहरुख खानफातिमा सना शेख