Join us

Sonu Sood covid-19 positive: कोरोना संकटातील देवदूत सोनू सूदला झाली कोरोनाची लागण, चाहते करतायेत त्याच्यासाठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:45 IST

अभिनेता सोनू सूदची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि त्याने स्वतःला क्वारंटाइन केले आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात अनेकांच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून आलेला आणि अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे.

सोनू सूदने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यात लिहिले की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.. मी तुमच्यासोबत आहे.

सोनू सूदला कोरोना झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे आणि ते काळजी घ्यायला सांगत आहेत.  तसेच त्याची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. 

कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. अनेकांना त्याने त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती आणि आता त्याने काहींना ऑक्सिजन सिलेंडर पाठवले आहेत. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची नितांत गरज होती. त्याने 10 ऑक्सिजन सिलेंडर पुरवले असून काहींंना इंजेक्शन देखील पुरवले आहेत.  कोरोना काळात मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा असे देखील तो त्याच्या चाहत्यांना सांगत आहे. इंदौरमधील मंडळीनी सोशल मीडियाद्वारे त्याचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या