Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा तर किळसवाणा प्रकार'; शत्रुघ्न सिन्हांचा अक्षय कुमारवर वार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:52 IST

शो बिझनेस आता शो-ऑफ बिझनेसमध्ये बदलतो आहे...!!

ठळक मुद्देपीएम नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. पण लॉकडाऊनची घोषणा करायला बराच उशीर झाला, नाही तर या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखता आला असता, असे ते म्हणाले.

कोराना संकटाशी लढत असलेल्या देशाच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने सर्वप्रथम पीएम केअर फंडात 25 कोटी रूपये दान करण्याची घोषणा केली. साहजिकच सोशल मीडियावर अक्षयचे अमाप कौतुक झाले. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आलेत. त्याच्या बातम्याही झळकल्या. पण बॉलिवूड सेलिब्रिटींनी दान दिलेल्या रकमेचा असा गवगवा करावा, हे कदाचित काहींना रूचलेले नाही.  अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा त्यापैकीच एक. होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दानाच्या रकमेची घोषणा करणा-यांबद्दल  शत्रुघ्न असे काही बोलले की, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. शत्रुघ्न यांचा टोमणा  अक्षय कुमारला तर नाही ना, असा सवाल यानंतर विचारला जात आहे.

असे काय बोलले शत्रुघ्न सिन्हाकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पीएम आणि सीएम फंडात दान दिले आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. अक्षय कुमारने पीएम फंडात 25 कोटी रूपये दान केले आहेत, हेही आपल्याला माहित आहे. शत्रुघ्न सिन्हा नेमक्या याच दानाबद्दल बोलले. दानात दिलेल्या रकमेचा खुलासा करणे ‘वल्गर’ आहे, असे एका ताज्या मुलाखतीत ते म्हणाले.

‘कुणी 25 कोटी दान दिलेत, हे ऐकणे मला स्वत:ला अतिशय वाईट वाटते. अशाने लोक कुणालाही दानात दिलेल्या रकमेच्या हिशेबाने जज करायला लागतात. जगात कुठेही ओरडून दान दिले जात नाही. दान देणे हा एक व्यक्तिगत विचार आहे. शो बिझनेस आता शो-ऑफ बिझनेसमध्ये बदलतो आहे,’असे शत्रुघ्न म्हणाले.पीएम नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. पण लॉकडाऊनची घोषणा करायला बराच उशीर झाला, नाही तर या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखता आला असता, असे ते म्हणाले.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाअक्षय कुमारकोरोना वायरस बातम्या