Join us  

Corona Effect : वर्कआऊटसाठी काय पण.. कोरोनामुळे कतरिना कैफनं वर्कआऊटसाठी शोधला हा ऑप्शन, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 2:39 PM

फिटनेस प्रेमींसाठी कतरिना कैफने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

 

कोरोना व्हायरसमुळे चित्रपट, मालिका संपूर्णच सिनेसृष्टीने काम थांबविले आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे कलाकारांनी घरीच थांबण्याचा पावित्रा घेतला आहे. तसेच जिमदेखील बंद आहेत. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी फिटनेससाठी पर्याय शोधून काढले आहेत. बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफनेदेखील फिटनेससाठी पर्याय शोधला आहे आणि तिने घराच्या टेरेसवर एक्सरसाइज करायला सुरूवात केली आहे. कोणत्याही किंमतीवर ती वर्कआऊट रुटीनला ब्रेक देण्यासाठी तयार नाही. अशापद्धतीने कतरिना कैफचा एक्सरसाईज व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

कतरिना कैफने वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, घरीच वर्कआऊट... जिम जाऊ शकत नाही त्यामुळे हा वर्कआऊट शेअर करत आहे जो घरी आपण करू शकतो. सुरक्षित रहा आणि शक्य असेल तर एक्टिव्हदेखील रहा. कतरिना कैफने हेदेखील सांगितलं की घरी राहून कशापद्धतीनं एक्ससाईज करू शकता. कतरिना कैफचा हा व्हिडिओ जवळपास तीन लाख व्ह्युज आले आहेत.

कतरिना कैफच्या वर्कआऊटबद्दल सांगायचं तर शेवटची ती भारत चित्रपटात झळकली होती.

कतरिना कैफ आगामी चित्रपट सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची रिलीज डेट कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. 

टॅग्स :कतरिना कैफअक्षय कुमारसूर्यवंशीफिटनेस टिप्स