दीपिका पादुकोण सध्या ब्रेकवर आहे. यावर्षी जानेवारीत दीपिकाचा ‘पद्मावत’ रिलीज झाला होता. तेव्हापासून दीपिकाने कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. रणवीर सिंगसोबत लग्न करणार असल्याने दीपिकाने कुठलाही प्रोजेक्ट साईन केला नसल्याचे सांगितले गेले होते. पण आता दीपिकाचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पद्मावत’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर प्रत्येकजण दीपिकाच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा करत होता. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, दीपिकाने दिग्दर्शिका मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे.या चित्रपटात दीपिका केवळ लीड रोल साकारणार नसून हा चित्रपट ती प्रोड्यूसही करतेय. म्हणजे, दीपिकाने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
Confirmed: दीपिका पादुकोणने साईन केला मेघना गुलजारचा चित्रपट! अशी असेल भूमिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 11:39 IST