पंजाबी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) तिच्या आगामी 'पीट स्यापा' या चित्रपटाच्या शूटिंगमुळे अडचणीत आली आहे. पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यातील सरहिंद येथील एका ऐतिहासिक मशिदीत शूटिंग केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोनम आणि सिनेमाच्या टीमच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शाही इमाम यांनी घेतली आक्षेप
पंजाबचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट सोनम बाजवा आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शाही इमाम यांनी म्हटले आहे की, सरहिंद येथील ज्या 'भगत साधना मशीद'मध्ये हे शूटिंग करण्यात आले, ती मशीद शीख आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांकडून अत्यंत आदराची मानले जाते. या ठिकाणी शूटिंग करणे अत्यंत दुर्देवी आहे आणि यामुळे मशिदीच्या पवित्रतेचा भंग झाला आहे.
शाही इमाम यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही मशिदीच्या आत शूटिंग करण्यास मनाई आहे. परंतु, या चित्रपटाच्या टीमने केवळ शूटिंगच केले नाही, तर धार्मिक नियमांचे उल्लंघनही केले. त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, मशिदीच्या आत रात्रीच्या वेळी शूटिंग करण्यात आले. पवित्र जागेत खाणे-पिणे करण्यात आले, जे धार्मिक परंपरेविरुद्ध आहे. मशिदीबाहेर शूटिंगवर बंदी असल्याचा बोर्ड लागलेला असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. चित्रपटातील काही दृश्ये धार्मिक श्रद्धेच्या विरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तपास आणि अटकेची मागणी
शाही इमाम यांनी एसएसपी फतेहगढ साहिब यांना पाठवलेल्या तक्रारीमध्ये अभिनेत्री सोनम बाजवा, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह, शूटिंगसाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही त्वरित गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मशिदीची पवित्रता भंग करणाऱ्या या कृत्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असं त्यांचं ठाम मत आहे.
Web Summary : Sonam Bajwa and her film crew face a complaint for allegedly hurting religious sentiments by shooting in a mosque in Punjab. A religious leader demands action for violating sacred rules and disrespecting the site.
Web Summary : पंजाब में मस्जिद में शूटिंग करने से धार्मिक भावनाएं आहत होने पर सोनम बाजवा और उनकी फिल्म टीम के खिलाफ शिकायत दर्ज की गई है। धार्मिक नेता ने पवित्र नियमों के उल्लंघन पर कार्रवाई की मांग की है।