Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडियन अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:04 IST

तिरंग्याचा अपमान केल्यामुळे या कॉमेडीयनला एक दिवसासाठी तुरूंगात जावं लागलं होतं.

कॉमेडियन जॉनी लीवर यांचा १४ ऑगस्टला वाढदिवस असतो. जॉनी लीवरचं बालपण खूप खडतर गेलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शाळेत फी न भरल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. याशिवाय त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. जॉनी लीवर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जानूमला आहे. हिंदुस्तान लीवरमध्ये काम केल्यामुळे त्यांचे नाव जॉनी लीवर पडलं. 

१९९९ साली एका खासगी कार्यक्रमात तिरंग्याचा अपमान केल्यामुळे जॉनी लीवर यांना सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर जॉनीने माफी मागितली आणि त्याची शिक्षा एक दिवसांची करण्यात आली.

जॉनी लीवर यांच्या मुलाला गळ्याचा ट्युमर झाला होता. त्यावेळी तो १२ वी इयत्तेत होता. हा ट्युमर इतका वाढला की त्याचं रुपांतर कर्करोगात झालं होतं. त्यामुळे जॉनी लीवर पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्यांच्या मुलाने १२ वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कर्करोगावरील उपचार केले. त्याने या आजारावर मात केली. मात्र त्यावेळी जॉनी लीवर यांनी चित्रपटात काम करणं सोडलं होतं. 

जॉनी लीवर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाविषयी जॉनी लीवर म्हणाले, ‘ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे.

स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’

टॅग्स :जॉनी लिव्हरस्टार प्रवाह