Join us

नाना पाटेकर-तनुश्री दत्ताच्या वादात कोरिओग्राफर गणेश आचार्यची उडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:31 IST

अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. 

अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. २००८ साली ‘हॉर्न प्लीज’या चित्रपटाच्या सेटवर नानाने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि यामुळे मला हा प्रोजेक्ट हातचा गमवावा लागला होता, असा खळबळजनक आरोप तनुश्रीने ताज्या मुलाखतीत केला आहे. 

‘झूम’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने याबाबत खुलासा केला. ‘मी एका गाण्याचे शूटींग करत होते. नाना त्या गाण्यात नव्हते. तरिही ते सेटवर येत. कोरिओग्राफर मला स्टेप शिकवत असताना ते मध्येच येत, माझा हात पकडत. मी त्यांच्या या वागण्याला वैतागली आणि  चित्रपटाच्या निर्मात्यांकडे तक्रार केली. याचा परिणाम म्हणजे, मला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले,’ असे तनुश्री यावेळी म्हणाली. यावेळी तनुश्रीने कोरिओग्राफर गणेश आचार्य यालाही दोषी ठरवले. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर जे काही झाले, त्यात गणेश आचार्य याचाही हात आहेच. मदतीसाठी येण्याऐवजी तो उभा राहून तमाशा बघत राहिला, असे ती म्हणाली.तनुश्रीच्या या आरोपानंतर गणेश आचार्य याने मीडियासमोर येते, नाना पाटेकर यांचा बचाव केला.नेटवर्क 18 सोबत बोलताना गणेश आचार्यने सगळे आरोप खोडून काढले. एक तर हे खूप जुने प्रकरण आहे. त्यामुळे नेमके काय झाले होते, हे मला नीट आठवत नाही. पण मला जितके आठवते त्यानुसार, एक डूएट गाणे होते. त्यादिवशी सेटवर काहीतरी झाले होते आणि शूटींग 3-4 तास थांबवण्यात आले होते. कलाकारांमध्ये गैरसमज   होते. पण मी इतके खात्रीपूर्वक सांगेल की, जे काही आरोप होत आहेत, तसे काहीही घडले नव्हते. नानाने कुण्याच् राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सेटवर बोलवले होते, हा आरोपचं खोटा आहे.  नाना पाटेकर एक चांगली व्यक्ती आहे़. ते असे काहीच करू शकत नाहीत. ते कायम लोकांची मदत करतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर नानांचे उपकार आहेत, असे गणेश आचार्य म्हणाला.

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकरगणेश आचार्य