Join us

साथऊच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडण्याचा मार्गावर, राम चरणसोबत आहे तिचं खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:34 IST

अभिनेत्रीच्या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले होते.

तेलुगू अभिनेत्री निहारिका कोनिडेला(Niharika Konidela)  कोणत्याही परिचयाची गरज नाही. बऱ्याच काळापासून निहारिका कोनिडेला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच निहारिका कोनिडेलाने पती चैतन्यला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

निहारिकाने चैतन्य जेवी(Chaitanya JV)सोबत २०२०मध्ये उदयपुरच्या उदय विलास पॅलेसमध्ये शानदार डेस्टिनेशन वेडींग केलं होते. या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर, आता निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जेव्ही यांच्या नात्यात सर्व काही ठीक चालले नाही. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये आपसात दुरावा असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, आता बातमी समोर येत आहे की, निहारिका कोनिडेलाने तिचा पती चैतन्य याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हँडलवरून अनफॉलो केले आहे. इतकेच नाही तर चैतन्यने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून निहारिका कोनिडेलासोबतच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

त्यामुळे निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जेव्ही यांचा संसार लवकरच मोडण्याचा मार्गावर  आहे आणि आगामी काळात हे जोडपे एकमेकांपासून वेगळे होऊन घटस्फोट घेणार असल्याचा अंदाज नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

राम चरण-अल्लू अर्जुनशी खान कनेक्शननिहारिका सुपरस्टार चिरंजीवी यांची भाची आहे. या नात्याने राम चरणची ती बहीण आहे. अल्लू अर्जुनची ही निहारिका चुलत बहीण आहे.  निहारिका कोनिडेलाने तिच्या चित्रपट कारकिर्दीत 'ओका मनसू आणि मुडप्पू अवकई आणि सूर्यकांत' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, निहारिकाचे हे चित्रपट काही खास दाखवू शकले नाहीत. 

टॅग्स :राम चरण तेजाचिरंजीवीTollywood