Join us

'छपाक'च्या शूटिंगपूर्वी दीपिका पादुकोण करणार 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 20:36 IST

अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी चित्रपट 'छपाक'च्या कामात सध्या व्यग्र आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी चित्रपट 'छपाक'च्या कामात सध्या व्यग्र आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहे.  या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाबाबत मेघना गुलजारने सांगितले की, ‘या सिनेमासाठी तयारी करणे ही माझ्यासाठी आणि दीपिकासाठी सगळ्यात कठीण परीक्षा आहे. शुटिंगच्या आधी मी दीपिका आणि विक्रांत लक्ष्मी अग्रवाल आणि तिचे पती आलोक दीक्षित यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष्मीचा खरा संघर्ष कसा होता हे जवळून पाहता येईल.’ लक्ष्मी अगरवाल हिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. पण या संकटासमोर हार न मानता लक्ष्मी अशा हल्ल्यांनी पीडित मुलींसोबत उभी राहिली.

मेघना गुलजार 'राजी', 'तलवार' अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या 'राजी' या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. 'राजी'नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय.  

टॅग्स :दीपिका पादुकोणविक्रांत मेसी