Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतवरून क्रिती सेनन आणि श्रद्धा कपूरमध्ये 'रस्सीखेच'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:03 IST

आता अशी माहिती समोर येतीये की, सुशांत आणि क्रितीमध्ये सगळंकाही ठिक नाहीये आणि याचं कारण ठरतीये अभिनेत्री श्रद्धा कपूर.  

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार रंगल्या आहेत. पण दोघांनीही अजून त्यांचं अफेअर जाहीरपणे मान्य केलं नाहीये. पण ज्याप्रकारे दोघे एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळाले, त्यावरून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होते आहे. अशातच आता अशी माहिती समोर येतीये की, सुशांत आणि क्रितीमध्ये सगळंकाही ठिक नाहीये आणि याचं कारण ठरतीये अभिनेत्री श्रद्धा कपूर.  

झालं असं की, श्रद्धा कपूरला सुशांत सिंह राजपूतच्या एका सिनेमासाठी कास्ट करण्यात आलंय. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमात आधी सुशांतसोबत क्रिती सेनन दिसणार होती. पण श्रद्धाने या सिनेमात क्रितीला बाहेरचा रस्ता दाखवलाय. क्रितीचा सिनेमा श्रद्धाने मिळवण्याची ही पहिली वेळ नाहीये.

याआधी सुद्धा एका सिनेमात श्रद्धाला क्रितीच्या जागी घेण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत अजूनतरी काही ऑफिशिअल घोषणा करण्यात आली नाहीये पण श्रद्धा आणि क्रिती यांच्यात चांगलीच धुसफूस सुरु असल्याची चर्चा होतीये. असे सांगितले जात आहे की, सुशांत आणि श्रद्धाचा हा सिनेमा एक कॉलेज ड्रामा असणार आहे. पण या सिनेमाची अजूनतरी अधिकृत घोषणा झाली नाहीये.

टॅग्स :बॉलिवूडश्रद्धा कपूरक्रिती सनॉनसुशांत सिंग रजपूत