Join us

बॉलिवूडची दिग्गज कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफचे निधन, इंडस्ट्रीवर शोककळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 10:32 IST

Seher Aly Latif : सहरच्या किडणीने काम करणे बंद केले होते. 8 दिवसांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

ठळक मुद्देसहरने तिच्या करिअरमध्ये द बेस्ट एग्जॉटिक मेरीगोल्ड होटल, मिलियन डॉलर आर्म, शकुंतला देवी, दुर्गामती-द मिथ, मान्सून शूटआऊट आणि लंच बॉक्स सारख्या सिनेमात शिवाय अनेक वेबसीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ (Seher Aly Latif) हिचे सोमवारी मुंबईत निधन झाले. सहरच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. यामुळे तिला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने तिची प्राणज्योत मालवली आहे. सहरच्या निधनावर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. राजकुमार राव, हुमा कुरेशी, अनुराग कश्यप, शिबानी दांडेकर, मिताली पालकर, निमरत कौर, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता आणि मुकेश छाब्रा सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे.

सहरने तिच्या करिअरमध्ये द बेस्ट एग्जॉटिक मेरीगोल्ड होटल, मिलियन डॉलर आर्म, शकुंतला देवी, दुर्गामती-द मिथ, मान्सून शूटआऊट आणि लंच बॉक्स सारख्या सिनेमात शिवाय अनेक वेबसीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते.

दिग्दर्शक नीरज उधवानीने सांगितले की, सहरच्या किडणीने काम करणे बंद केले होते. 8 दिवसांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  अभिनेत्री स्वरा भास्करने सहरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिलेय, मी तुला खूप त्रास द्यायची. कारण तू मला किती आवडायची, हे मी तुला सांगू शकत नव्हते.

टॅग्स :बॉलिवूड