बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याचे बॉक्स ऑफिसवर जितके चित्रपट गाजले तितकीच त्याची लव्हलाइफही चर्चेत राहिली आहे. आतापर्यंत कालाविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या सलमान लुलिया वंतूर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. परंतु, सध्या सलमानसंबंधित एक किस्सा सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. यामध्ये एकेकाळी सलमान अभिनेत्री कतरिना कैफचा (katrina kaif) प्रत्येक फोटो झूम करुन पाहायचा. विशेष म्हणजे सलमाननेच या गोष्टीची कबुली दिली आहे.
अलिकडेच कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, अजूनही सलमान-कतरिनाच्या रिलेशनच्या चर्चा काही केल्या कमी होत नाही. यामध्येच द कपिल शर्मा शोमध्ये सलमानने कतरिनासंदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात तो कतरिनाचा प्रत्येक फोटो निरखून पाहायचा असं त्याने सांगितलं. काही काळापूर्वी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (the kapil sharma show) सलमान आणि कतरिनाने हजेरी लावली होती. यावेळी सलमानने त्याची गुपितं उघड केली.
सोशल मीडियावर तुम्ही मुलींचे फोटो झूम करुन पाहता का? असा प्रश्न कपिलने सलमानला विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देत सलमानने कतरिनाचा फोटो पाहतो असं सांगितलं. इतर मुलींचे फोटो तर नाही. पण, हिचे (कतरिना कैफ) सगळे फोटो झूम करुन नक्की पाहतो, असं सलमान म्हणाला.
दरम्यान, सलमानच्या या वाक्यानंतर अनेक जण हसले. परंतु, कतरिनाने त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. कतरिना आणि सलमान यांच्या नात्याविषयी कितीही चर्चा रंगल्या तरीदेखील या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. कतरिना-विकीच्या लग्नाला तो उपस्थित नसतांनाही त्याने या नवविवाहित जोडप्यांना रेंज रोव्हर ही नवीन कोरी कार गिफ्ट केली. तर, अलिकडेच सलमानच्या वाढदिवशी कतरिनाने एक खास पोस्ट त्याच्यासाठी शेअर केली होती.