Join us

कान्समध्ये Oops मोमेंट! उर्वशी रौतेलाचा ड्रेस फाटला, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:16 IST

उर्वशीने फाटलेल्या ड्रेसमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली.

Urvashi Rautela Wardrobe Malfunction Cannes 2025 : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ सुरू झाला आहे. यंदा भारतीय अभिनेत्रींच्या फॅशन आणि लुक्सनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्री उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये तिच्या लुक्समुळे चर्चेत आहे. मात्र, या वेळी तिच्या लुकपेक्षा तिच्या ड्रेसमुळे ती ट्रोलिंगच्या भोवऱ्यात सापडली आहे. उर्वशी रौतेला कान्सच्या पहिल्या दिवशी रंगीबेरंगी ड्रेसमध्ये पोहचली होती.  तिच्या हातात पोपटाच्या डिझाईनची पर्स होती. या पर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीलाही टीकेचा सामना करावा लागला होता. तर आता उर्वशी ही ops मोमेंटची शिकार झालेली दिसून आली आहे.

उर्वशीने नुकतंच कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली. तिनं डिझायनर नाजा सादे यांच्या कलेक्शनमधील ब्लॅक गाऊन परिधान केला होता. त्यात ती सुंदर दिसत होती. पण, जेव्हा तिनं कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यास सुरुवात केली, तेव्हा हा गाऊन डाव्या हाताच्या काखेत फाटलेला असल्याचं स्पष्ट दिसलं आणि नेटकऱ्यांनी लगेचच ते ओळखलं. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

एक नेटकरी म्हणाला, "कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालणारी पहिली भारतीय अभिनेत्री!". दुसऱ्या युजरनं लिहिलं, "तिच्या नशिबात काहीतरी गडबड आहे. आधी revolving door मध्ये अडकलं, नंतर पोपटासारखा ड्रेस घालून पोपटासोबत आली, आणि आता फाटलेला ड्रेस!". तर काही युजर्सनी तिच्या लुकवर टीका करत म्हटलं, "जागतिक पातळीवर अशा प्रकारचा ड्रेस घालणं अजिबात योग्य नाही".

पब्लिसिटी स्टंट?

काहींनी हा प्रकार पब्लिसिटी स्टंट असल्याची शक्यताही व्यक्त केली. उर्वशीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यावर अद्याप उर्वशीने कोणतंही वक्तव्य दिलेलं नाही.

टॅग्स :उर्वशी रौतेलाकान्स फिल्म फेस्टिवलसेलिब्रिटी