Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी 'बॉर्डर २'चा मोठा फायदा! सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 08:52 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'बॉर्डर २' या चित्रपटाने केवळ गतीच पकडली नाही, तर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत.

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून स्वतःला 'ब्लॉकबस्टर' म्हणून सिद्ध केले आहे.

सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने 'बॉर्डर २' ला त्याचा मोठा फायदा मिळाला. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चौथ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ५६ ते ५९ कोटी नेट कलेक्शन केले आहे. सामान्यतः सोमवारी चित्रपटांच्या कमाईत मोठी घट पाहायला मिळते, परंतु 'बॉर्डर २' च्या बाबतीत उलट चित्र दिसले; रविवारी झालेल्या ५४.५ कोटींच्या कमाईपेक्षाही जास्त गल्ला सोमवारी जमला आहे. यासह चित्रपटाचे एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन आता १८० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

या जबरदस्त कमाईमुळे 'बॉर्डर २' आता सर्वात जास्त 'मंडे कलेक्शन' करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाने स्त्री २ (५५.९ कोटी), केजीएफ २ (५०.३५ कोटी) आणि बाहुबली २ (४०.२५ कोटी) यांसारख्या दिग्गज चित्रपटांच्या चौथ्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे. जरी हा चित्रपट शाहरुख खानच्या 'पठाण'च्या (७० कोटी - प्रजासत्ताक दिन) रेकॉर्डच्या थोडा मागे असला, तरी गेल्या काही वर्षांतील प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित झालेल्या 'फायटर' आणि 'स्काय फोर्स' यांसारख्या चित्रपटांना त्याने धूळ चारली आहे.

'बॉर्डर २' चित्रपटाची एकूण घौडदौड पाहता, हा सिनेमा आज (मंगळवारी) किंवा उद्यापर्यंत २०० कोटींचा सहजपणे आकडा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिकांचेही प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. याशिवाय प्रमुख भूमिकेत असलेल्या सनी देओलच्या अभिनयाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Border 2' Roars on Republic Day, Sunny Deol Film Soars!

Web Summary : Sunny Deol's 'Border 2' dominated the box office, earning over ₹180 crore in four days. The Republic Day holiday boosted collections, surpassing many records. It's poised to cross ₹200 crore soon, praised for performances.
टॅग्स :सनी देओलबॉक्स ऑफिस कलेक्शनवरूण धवनअहान शेट्टी