Join us

आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:56 IST

बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचं काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आईच्या निधनानंतर बोनी यांनी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे

काल (२ मे) बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी निर्मल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबात शोककळा पसरली आहे. निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय आईला श्रद्धांजली वाहिली आहे. संपूर्ण कपूर कुटुंब निर्मल कपूर यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालं आहे. बोनी कपूर आईच्या निधनानंतर काय म्हणाले.

बोनी कपूर आईच्या निधनानंतर काय म्हणाले?

बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे की, "२ मे २०२५ रोजी प्रेमळ कुटुंबाला मागे सोडून निर्मल कपूर यांचं निधन झालं. आईने आनंदाने तिचं आयुष्य जगलं. चार मुलं, प्रेमळ सूना, एक काळजी घेणारा जावई, अकरा नातवंडे, चार पतवंडे आणि आयुष्यभराच्या अमूल्य आठवणी ती मागे सोडून गेली.  जे तिच्या सानिध्यात आले त्या सर्वांच्या हृदयावर अथांग प्रेमाने तिने स्पर्श केला. ती आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील आणि कायम स्मरणात राहील." अशी पोस्ट बोनी यांनी लिहिली आहे.

ही पोस्ट त्यांनी-  बोनी, अनिल, रीना, संजय, सुनीता, संदीप, महीप, मोहित, अक्षय, सोनम, अर्जुन, रिया, हर्षवर्धन, अंशुला, जान्हवी, शनाया, खुशी, जहान, अंतरा, आनंद, आशिता, करण, थेआ, वायु, आयरा आणि युवान, या सर्वांच्या वतीने लिहिली आहे. या पोस्टला बोनी कपूर यांनी केवळ एकच शब्द कॅप्शन म्हणून दिला आहे तो म्हणजे,  “आई”, अशाप्रकारे आईच्या निधनाने बोनी कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. आज निर्मला कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :बोनी कपूरअनिल कपूरसंजय कपूरबॉलिवूड