Mukul Dev Death: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचं (Mukul Dev) निधन झालं आहे. दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान, वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री मुकुल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची झाल्याची माहिती मिळते आहे. परंतु अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुकुल देवच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
दरम्यान, अभिनेत्री दीपशिखा नागपालने सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा दिला आहे. तिने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करुन अभिनेत्याच्या निधनाची माहिती दिली आहे. आईवडिलांच्या निधनानंतर, मुकुल स्वतःला वेगळा पाहत होता. मुकुल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निधनाची बातमी कळताच चाहते शोक व्यक्त करत आहेत.
मुकुल देवच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. 'दस्तक', 'यमला पगला दिवाना', 'आर... राजकुमार', 'जय हो' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. मुकुल देव यांचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात मूळ असलेल्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील हरी देव, सहाय्यक पोलिस आयुक्त होते.