२०२४ संपायला आता अवघा एक महिना बाकी आहे. या वर्षाची अखेर 'पुष्पा २'मुळे धमाकेदार होणार यात शंका नाही. २०२४ मध्ये अनेक सिनेमे गाजले. काही सिनेमे फ्लॉपही झाले. आता सर्वांना वेध लागले आहेत ते २०२५ चे. पुढील वर्षी अर्थात २०२५ मध्ये अनेक बॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत. बायोपिक, रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर, मल्टिस्टारर अशा अनेक बॉलिवूड सिनेमांची २०२५ मध्ये चलती आहे. पाहा संपूर्ण यादी.
२०२५ मध्ये रिलीज होणार हे सिनेमे
- देवा - शाहीद कपूरचा 'देवा' सिनेमा हा बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखला जातोय. वॅलेंटाईन डेला अर्थात १४ फेब्रुवारी २०२५ ला सिनेमा रिलीज होणार आहे.
- सिकंदर- सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. 'सिकंदर' सिनेमा ईद २०२५ ला भेटीला येणार आहे
- स्काय फोर्स-अक्षय कुमारचा बहुचर्चित 'स्काय फोर्स' सिनेमा प्रजासत्ताक दिन २०२५ ला भेटीला येण्याची शक्यता आहे. या सिनेमात अक्षयसोबत सारा अली खानही आहे
- सनी संस्कारी की तुलसी कुमारी- वरुण धवन-जान्हवी कपूरच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केलीय.
- थामा- आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदानाचा 'थामा' सिनेमा 'स्त्री' युनिव्हर्सचा पुढचा भाग असणार आहे. 'मुंज्या' फेम आदित्य सरपोतदार सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
- छावा- विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित 'छावा'ची रिलीज डेट 'पुष्पा २'मुळे पुढे ढकलल्याने हा सिनेमा आता २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.
- अल्फा- आलिया भट, शर्वरीचा 'अल्फा' सिनेमा डिसेंबर २०२५ मध्ये ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.
- वॉर 2- हृतिक रोशन, ज्यु.एनटीआरचा 'वॉर 2' सिनेमा मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी आहे. यशराजच्या स्पाय युनिव्हर्सचा हा पुढचा भाग असणार आहे.