Join us

'इथेही अभिनय करतेय का?'; राष्ट्रगीतावेळी करीनाने केली चूक; नेटकऱ्यांनी घेतली 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:13 IST

Kareena kapoor: राष्ट्रगीत गात असताना करीनाने एक चूक केली. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (kareena kapoor) जितके हिट सिनेमा देते त्याच्यापेक्षा जास्त पटीने तिच्या अॅटिट्यूडमुळे ट्रोल होते. बऱ्याचदा चाहत्यांशी फटकून वागल्यामुळे, सहकलाकार वा अन्य अभिनेत्रींकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा एखाद्यावेळी प्रसंगाचं भान नसल्यामुळे अशा कितीतरी कारणांमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने राष्ट्रगीत म्हणतांना केलेल्या चुकीमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

करीना लवकरच 'जाने जान' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रगीत गात असताना करीनाने एक चूक केली. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नेमकी का होतीये करीना ट्रोल?

या कार्यक्रमात करीनाने दीपप्रज्वलन केल्यानंतर सगळ्यांनी उभं राहून राष्ट्रगीत गायलं. हे राष्ट्रगीत सुरु असताना प्रथम ती सावधान मुद्रेत उभी होती. परंतु, त्यानंतर तिने दोन्ही हात बांधले. तिची ही कृती पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

कोणी तरी तिला सांगा राष्ट्रगीत गाताना सावधान स्थितीत का उभं राहतात ते. हात धरत नाही यावेळी, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ती इथेही अभिनय करतीये का? असा खोचक सवाल एकाने विचारला आहे. तसंच, राष्ट्रगीत गाताना सावधान उभं राहतात हे कदाचित स्टार्सला माहीत नाहीये. लज्जास्पद आहे, असंही काही जणांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी