Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या १० वर्षानंतर पत्नीसह एकत्र राहतोय बॉलिवूडचा दिग्दर्शक, नात्याबद्दल प्रतिक्रिया देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:27 IST

१० वर्षापूर्वी घटस्फोट घेतला, आता प्रसिद्ध दिग्दर्शक नात्याला पुन्हा देणार संधी? खुलासा करत म्हणाले...

Priyadarshan : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांना दर्जेदार पटकथांसाठी ओळखलं जातं. माणसाच्या जीवनातील ग्रे शेड स्लॅपस्टिक कॉमेडीच्या अंगाने मांडणाऱ्या मोजक्या दिग्दर्शकांपैकी ते एक आहेत.प्रियदर्शन भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपासून दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम करत आहे. त्यांनी प्रामुख्याने मल्याळम, तमिळ, हिंदी आणि तेलुगू या ४ भारतीय भाषांमध्ये ९५ हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सध्याच्या घडीला प्रियदर्शन याचं नाव इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या यादीच अव्वल स्थानावर येतं. सध्या प्रियदर्शन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. 

वैयक्तिक आयुष्यात त्यांनी १३ डिसेंबर १९९० ला अभिनेत्री लिसीशी विवाह केला. मात्र २०१६ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. मात्र,घटस्फोटानंतरही हे जोडपं एकत्र राहतं. त्यांनी आपल्या नात्याला नवी संधी देण्याचं ठरवलं आहे.याबद्दल प्रियदर्शन यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. गतवर्षी दिग्गज दिग्दर्शक सिबी मलयिल यांच्या मुलाच्या लग्नात दोघं एकत्र दिसले होते, त्यामुळे ते एकत्र आल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. सिबी यांच्यासोबत फोटो काढण्याव्यतिरिक्त, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते एकमेकांचा हात धरून चालताना आणि बोलताना दिसले होते.आता स्वतः प्रियदर्शन यांनीच या गोष्टीला दुजोरा दिला आहे. 

लग्नाबद्दल प्रियदर्शन काय म्हणाले?

अलिकडेच 'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. घटस्फोटाच्या १० वर्षानंतरही ते आणि पत्नी एकत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मॅरेज सर्टिफिकेट सोडलं तर, आम्ही दोघेही आता तेच आयुष्य पुन्हा एकत्र जगत आहोत." असा खुलासा त्यांनी केला.

प्रियदर्शन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस मल्याळम सिनेमात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आपल्या दिग्दर्शनाची जादू आजमावयला ते २००० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आले.मल्याळम चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक करण्यासाठी ते ओळखले जातात. हेरा फेरी, हंगामा, हलचल, गरम मसाला, भागम भाग, चुप चुप के, दे दना दन आणि भूल भुलैया या अशा बॉलीवूड चित्रपटांचा त्यात महत्वपूर्ण उल्लेख करावा लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Director Priyadarshan and wife reunite after divorce, share relationship update.

Web Summary : Director Priyadarshan and his ex-wife, actress Lissy, are living together again after divorcing in 2016. Priyadarshan confirmed they are essentially living as husband and wife, marriage certificate aside, after being spotted together.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीघटस्फोट