Join us

विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 14:35 IST

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानमधून मायदेशी परतणार आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहेयात बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानमधून मायदेशी परतणार आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. बी-टाऊनच्या सेलेब्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन यांच्या वापसीवर आपला आनंद व्यक्त केला आहे.  

 

 

 

अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे, शीश झुकाकर अभिनंदन 

 

तापसी पन्नू लिहिते,  आता फक्त अभिनंदन तुमच्या परतण्याची वाट बघते. 

विवेक ओबेरॉय म्हणतो,  विंग कमांडर अभिनंदन तुमच्या परतीची बातमी ऐकून मी खूप खुश. आमची मान अभिमानाने उंचावली आहे.    

 बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी पाकिस्तानी संसदेत केली. इम्रान खान यांची ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जातेय. 

टॅग्स :अभिनंदन वर्धमानअमिताभ बच्चनतापसी पन्नूविवेक ऑबेरॉय