(Image Credit : Bollywood Bubble)
बॉलिवूड कलाकार हे आपल्या चाहत्यांसाठी आयकॉन असतात. कारण पडद्यावर त्यांची रुप परफेक्ट आणि बिनधास्त वाटतात. पण हे विसरुन चालणार नाही की, बॉलिवूड कलाकार असले तरी माणसंच आहेत. आता तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल की, तुमच्याप्रमाणे तुमच्या आवडत्या कलाकारांनाही कशाची ना कशाची भीती वाटते. चला जाणून घेऊ कोणत्या कलाकारांना कशाची वाटते भीती....
शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान याला घोड्यांची भीती वाटते. त्यामुळेच फार कमी सिनेमात तो आपल्याला घोड्यांवर बघायला मिळाला.
कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफला टोमॉटोची भीती वाटते. इतकी की, तिने एका टोमॉटो केचपच्या जाहीरातीत काम करण्याची ऑफर धुडकावली होती. यासाठी तिला कोट्यवधी रुपये मिळणार होते.
विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालन हीला मांजरीची फार भीती वाटते. तिला मांजर दिसली तरी ती फार टेम्पर होते.
प्रियंका चोप्रा
अभिनेत्री प्रियंका चोप्राला सुद्धा शाहरुख खानप्रमाणे घोड्याची भीती वाटते. पण तिने सांगितले होते की, ती ही भीती घालवण्यावर काम करत आहे.
अर्जुन कपूर
अभिनेता अर्जुन कपूरची भीती तर फारच मजेशीर आहे. अर्जुनला सिलींग फॅनची खूप भीती वाटते. याच कारणामुळे त्याने त्याच्या घरात एकही सिलींग फॅन लावला नाहीये.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माला तुम्ही काही जाहिरातींमध्ये आणि सिनेमातही बाईक चालवताना पाहिले असेल पण खरंतर तिला बाईक चालवण्याची फार भीती वाटते.
दीपिका पादुकोन
ज्या गोष्टीची बहुतेक गोष्टीची भीती वाटते त्याच गोष्टीची भीती दीपिकालाही वाटते. दीपिकाला सापांची भीती वाटते.
आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्टला अंधाराची भीती वाटते. तिने एकदा सांगितले होते की, ती झोपताना ती रुममध्ये प्रकाश यावा म्हणून थोडी खिडकी उघडी ठेवते.
अभिषेक बच्चन
अभिनेता अभिषेक बच्चन याला तर चक्क फळांची भीती वाटते. त्याने हे मान्यही केलं की, तो लहानपणापासून एकही फळ खात नाही.