बॉलिवूडची लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शिका शानू शर्मा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत शानू शर्माने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर आता शानू शर्मा आयुष्यातील वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार आहे. शानूच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नाचे फोटो शेअर करत शानू शर्माने इन्स्टाग्रामवर लिहिलं की "देवाच्या कृपेने मला या जगातील सगळ्यात चांगला जोडीदार मिळाला. आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आम्ही लग्नाच्या बेडीत अडकले आहोत". शानू शर्माने पारंपरिक पद्धतीने मोजक्या पाहुणांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. तिचा विवाहसोहळा २५ एप्रिलला संपन्न झाला. मात्र शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये शानूने तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही.
कोण आहे शानू शर्मा?
शानू शर्मा ही बॉलिवूडची लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शिका आहे. रणवीर सिंग, वाणी कपूर, भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, अनुष्का शर्मा अशा कितीतरी कलाकारांचं कास्टिंग तिने केलं आहे. सैयारामध्ये हिट ठरलेली जोडी अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचं कास्टिंगही शानू शर्मानेच केलं होतं.
Web Summary : Bollywood's casting director Shanoo Sharma got married on April 25. She shared wedding photos on social media, but hasn't revealed her husband's face. Shanoo has casted for many stars including Ranveer Singh and Anushka Sharma.
Web Summary : बॉलीवुड की कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा 25 अप्रैल को शादी के बंधन में बंध गईं। उन्होंने सोशल मीडिया पर शादी की तस्वीरें साझा कीं, लेकिन अपने पति का चेहरा नहीं दिखाया। शानू ने रणवीर सिंह और अनुष्का शर्मा सहित कई सितारों के लिए कास्टिंग की है।