Bollywood Actress Vaani Kapoor : सिनेसृष्टीत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नवख्या कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा कलाकार या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल बोलताना दिसतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. शिवाय शरीरयष्टीवरून अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर आहे. अलिकडेच वाणी 'रेड-२' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्यात आता दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने कठीण काळावर भाष्य केलंय.
'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वाणी कपूरने तिच्या इंडस्ट्रीतील अनुभवांविषयी सांगितलं आहे. त्यादरम्यान, एक किस्सा शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, "मला थेट सांगण्यात आलं नाही पण अशी माहिती इतर लोकांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचते. एका चित्रपट निर्मात्याने मी गोरी नसल्यामुळे भूमिकेसाठी नाकारलं होतं. तसंच शरीरयष्टीवरून बोलण्यात आलं होतं, असं तिने सांगितलं.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यानंतर मी ठरवलं की जे आहे ते आहे. जर त्याचं म्हणणं हेच असेल तर मला अशा प्रोजेक्टचा भाग व्हायचं नाही.कधीकधी मला मी खूप बारीक असल्यामुळे ऐकावं लागतं. शिवाय मला थोडं वजनही वाढवावं लागेल असं सांगण्यात येतं. पण, मी जशी आहे तशीच ठिक आहे. त्यामुळे मला स्वतःमध्ये काहीही बदल करायचे नाहीत. मला सहसा या गोष्टींचा त्रास होत नाही."
वर्कफ्रंट
वाणीचा पहिला चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स' होता, जो २०१३ साली रिलीज झाला होता. यात सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा होती. शेवटची वाणी 'रेड-२' या चित्रपटात दिसली होती.