Join us

कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:46 IST

उर्फी जावेदच्या नवीन फॅशन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत उर्फी कमळातून प्रकट झालेली दिसतेय. तुम्हीही बातमीवर क्लिक करुन हा खास व्हिडीओ बघा

अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. उर्फी कोणत्याही वस्तूपासून बनवलेले कपडे परिधान करु शकते. उर्फीची फॅशन तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत असते. अशातच उर्फीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फीने पुन्हा एकदा नवीन ड्रेस परिधान करुन सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. उर्फीने कमळाच्या पाकळ्या असलेला ड्रेस परिधान केला आहे. जाणून घ्या. 

..अन् ड्रेसमधून उर्फी बाहेर आली

उर्फी नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटमध्ये उर्फीच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं. या ड्रेसची खासियत म्हणजे उर्फीच्या ड्रेसवर कमळाच्या पाकळ्या दिसून येतात. काही वेळानंतर या पाकळ्या उमलतात आणि खालच्या दिशेने झुकतात त्यातून उर्फीचा चेहरा सर्वांना दिसतो. अनेकांना उर्फीची ही अनोखी फॅशन चांगलीच आवडलेली दिसतेय. उर्फी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय. उर्फीचा व्हिसा रद्द झाल्याने तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाता आला नाही.  पण तरीही अनोखी फॅशन करणं उर्फीने काही सोडलेलं दिसत नाही.

उर्फीचा कान्सला जाता आलं नाही

उर्फीला तिच्या युनिक फॅशन सेन्सच्या जोरावर जाण्याची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्याची संधी मिळाली होती. मात्र तिचा व्हिसाच रिजेक्ट झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले, "मी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर दिसले नाही. कारण मी एका फेजमधून जात आहेत. माझा बिझनेस ठप्प झाला आहे. रिजेक्शन्स झेलत मी अनेक वेगळ्या गोष्टी केल्या. मग अचानक मला कान्सला जाण्याची संधी मिळाली. यासाठी दिपा खोसला आणि क्षितिज कंकारियाचे आभार. पण नशीब बघा माझा व्हिसा रिजेक्ट झाला. आम्ही खरंतर अनेक कल्पनांवर काम करत होतो. मात्र आता मी आणि माझी टीम निराश झालो आहोत." 

टॅग्स :उर्फी जावेदफॅशनव्हिसाबॉलिवूड