बॉलिवूडची एक अभिनेत्री जी करिअरच्या शिखरावर होती. तिने अनेक सिनेमांमध्येही काम केलंय. शाहरुख खानसारख्या दिग्गजांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. पण नंतर मात्र ती इंडस्ट्रीतून गायब झाली. ही अभिनेत्री तिच्या बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. हीच अभिनेत्री तब्बव २४ वर्षांनंतर मनोरंजन विश्वात कमबॅक करत आहे. ही अभिनेत्री आहे ट्विंकल खन्ना. अक्षय कुमारची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना ओटीटीच्या माध्यमातून तब्बल २४ वर्षांनी शानदार कमबॅक करायला सज्ज आहे.
ट्विंकल- काजोलची जोडी जमणार
प्राईम व्हिडीओच्या आगामी ओरिजिनल टॉक शो “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा शो दोन प्रख्यात आणि सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना त्यांच्या दमदार उर्जेत आणि आकर्षक शैलीत होस्ट करणार आहेत. प्राइम व्हिडिओ हा शो घडवत असून या शोमध्ये बॉलिवूड जगताशी संबंधित अनेक मान्यवर व्यक्ती हजेरी लावणार आहेत. “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हा शो ग्लॅमरस रेड कार्पेट कार्यक्रमांना देखील मागे टाकण्याची शक्यता आहे. कारण हा शो बोल्ड पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, निखिल माधोक याशिवाय बनिजेय एशिया-मधील ग्रुप चीफ डेवलपमेंट ऑफिसर मृणालिनी जैन, व एंडेमोल शाइन इंडिया द्वारे अशा सर्वानी या टॉक शोबद्दल आनंद साजरा केलाय. “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हा टॉक शो धमाल असणार यात शंका नाही, ट्विंकल खन्नाचं या शोद्वारे कसं कमबॅक होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.