Join us

बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 13:29 IST

दरवर्षी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही दुर्गापूजेत सहभागी होतात. अशाच एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. 

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाचा माहौल आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्व साजरा होतो. नऊ दिवस देवीची आराधना करून मोठ्या भक्तीभावाने भाविक पूजा करतात. दरवर्षी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही दुर्गापूजेत सहभागी होतात. अशाच एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. 

वरिंदर चावला या इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत देवीच्या गाभाऱ्यात काही जण बंगाली नृत्य करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीदेखील सहभागी झाल्याचं दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तनिषा मुखर्जी आहे. पांढऱ्या रंगाची साडी नेसून खास लूक करून तनिषा दुर्गा पुजेत सहभागी झाल्याचं दिसत आहे. दुर्गापूजेतील तनिषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

तनिषा ही काजोलची बहीण आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही लेकींनी अभिनयाची वाट धरली. काजोलला बॉलिवूड करिअरमध्ये यश मिळालं. पण, तनिषाला हवं तसं स्टारडम मिळवता आलं नाही. सरकार, शsss, तुम मिलो तो सही, अंतर, बी केअरफुल अशा काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४सेलिब्रिटीनवरात्री