Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तब्बूने नाकारली होती 'मुन्नाभाई एमबीबीएस' मधील 'चिंकी'ची भूमिका, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:17 IST

तब्बूने का नाकारली 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमाची ऑफर? 'हे' होतं कारण 

Munna Bhai MBBS: बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची भूमिका प्रचंड गाजली होती. चित्रपटात संजय दत्तने मुन्नाभाई तर सर्किटच्या भूमिकेत अर्शद वारसी झळकला होता. याशिवाय चित्रपटातील आणखी एका पात्राची सुद्धा चांगलीच चर्चा होती. ते पात्र म्हणजे चिंकीचं होतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? मुन्नाभाई एमबीबीएस मधील डॉ.सुमनच्या भूमिकेसाठी ग्रेसी सिंह नाहीतर दुसऱ्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, तिने हा ब्लॉकबस्टर  सिनेमा नाकारला. 

मुन्नाभाई एमबीबीएस हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात संजय दत्त, आर्शद वारसी,बोमण ईराणी आणि ग्रेसी सिंग या कलाकारांच्या भूमिका होत्या. अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना अभिनेते बोमण ईराणी यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल हिंट दिली. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांमध्ये चर्चा रंगली आहे. राजकुमार हिरानींच्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला तब्बू हीच निर्मात्यांची पहिली पसंती होती. या  चित्रपटातील डॉ.सुमनच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूला पहिल्यांदा विचारणा करण्यात आली होती. मात्र,तिने या भूमिकेसाठी नकार दिला होता. कारण त्या वेळी, तब्बू एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने हा सिनेमा रिजेक्ट केला. त्यानंतर या चित्रपटासाठी ग्रेसी सिंहची निवड झाली. 

२००६ मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ या नावाने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा सीक्वल आला. यातही संजय दत्त लीड रोलमध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tabu rejected 'Munna Bhai MBBS' role; here's why.

Web Summary : Tabu declined the role of Dr. Suman (Chinki) in 'Munna Bhai MBBS' due to prior commitments. The role then went to Gracy Singh. The film was a major hit. A third part is hinted at.
टॅग्स :तब्बूसंजय दत्तबॉलिवूडसिनेमा