Shilpa Shirodkar: बॉलिवूडची सेन्सेशनल क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. रमेश सिप्पी यांच्या भ्रष्टाचार या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर शिल्पा शिरोडकरच्या करिअरला कलाटणी मिळाली. या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेत्रीने केलेले 'खुदा गवाह','हम','ऑंखे ' हे चित्रपट देखील गाजले.मात्र, यशाच्या शिखरावर असताना शिल्पा लग्न करुन परदेशात स्थायिक झाली.कुटुंबासाठी तिने अभिनयापासून दुरावली. अलिकडेच शिल्पा शिरोडकर बिग बॉस १८ च्या पर्वात झळकली. त्यानंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली. सध्या ही अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
डेलनाज इराणी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पा शिरोडकरने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्यानंतर तो काळ तिच्यासाठी कसा होता, याबद्दल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली," मला कायम लोकांमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे मी अशा करिअरची निवड केली जिथे रोज नवीन लोक मला भेटायचे. मी या सगळ्यात खूप व्यग्र असायचे. पण, याउलट परदेशात मला एकटेपणा जाणवायचा."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,"आमच्या लग्नाला जवळपास २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात आम्ही कधीच एका देशात राहिलो नाही. आम्ही खूप प्रवास केला आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप कठीण होतं.मला कायम एकटेपण खात होतं. नवरा कामासाठी बाहेर असायचा. त्यानंतर माझी लेक उच्चशिक्षणासाठी परदेशात गेली. या सगळ्यात मी घरी एकटीच असायचे. पण,आता मी एकटी नाही राहू शकत. माझ्या आजुबाजूला आपली माणसं पाहिजेत, ज्याच्यांवर माझं जीवापाड प्रेम आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
याशिवाय शिल्पा शिरोडकरने असंही सांगितलं की, कोणातीही ऑफर नसताना मी इंडस्ट्रीत कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कास्टिंग एजेंट्सना देखील कॉल केल्याचं तिने म्हटलं.मात्र, तरीही काहीच घडत नव्हतं. सध्या शिल्पा शिरोडकर तिच्या आगामी जटाधरा चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.