Join us
Daily Top 2Weekly Top 5

'खऱ्या आयुष्यात मी खूपच लाजाळू'; ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

By शर्वरी जोशी | Updated: January 11, 2022 18:46 IST

Rupali suri : रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सध्याच्या काळात कलाविश्वात अनेक सेलिब्रिटींची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात नवोदितांपासून दिग्गजांपर्यंत अनेक नावं आता प्रेक्षकांना ओळखीची झाली आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली सुरी(rupali suri). अल्पावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठणारी ही अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. परंतु, रुपाली खऱ्या आयुष्यात अत्यंत साधी आणि लाजाळू आहे. अलिकडेच तिने तिच्या आगामी शॉर्टफिल्मच्या निमित्ताने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिच्या पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

"मी खऱ्या आयुष्यात खूप लाजाळू आहे. मला कोणाशीही बोलताना किंवा एखादी गोष्ट मागतांना अवघडल्यासारखं होतं. पण कायमच माझ्या वाट्याला माझ्या स्वभावापेक्षा विरुद्ध भूमिका येतात. यात अनेकदा बोल्ड, स्ट्रॉग कॅरेक्टरच मला मिळतात. पण मी खऱ्या आयुष्यात खूप लाजाळू आहे", रुपाली म्हणाली.

'विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळाच'; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

पुढे ती म्हणते,  "स्वभावापेक्षा विरुद्ध बोल्ड, स्ट्रॉग भूमिका साकारणं खूप मोठं आव्हान आहे. पण, स्टेजवर काम करुन माझ्या मनातली भीती किंवा लाजाळूपणा थोडा कमी झाला आहे. मला माझ्या भावना कशा व्यक्त करायच्या हे समजू लागलंय. मी या क्षेत्रात बरंच काही शिकले आणि अजूनही शिकतीये. अभिनयाचं क्षेत्रच असं आहे ज्याचा अभ्यासक्रम कधीच संपत नाही. एक धडा संपला की लगेच नवा धडा सुरु होतो."

दरम्यान, रुपाली सुरी हे नाव कोणत्याही प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगना आणि मॉडेलदेखील आहे. यापूर्वी तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये (beauty contest) भाग घेतला आहे. रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या नावाची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाशॉर्ट फिल्म