Pati Patni Aur Woh 2:बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत. डॉन, जुडवा यांसारख्या चित्रपटांनंतर साल १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पती पत्नी और चा रिमेक करण्यात आला. जवळपास ४० वर्षानंतर या चित्रपटाचा रिमेक २०१९ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत होता. 'पती पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये जुन्याच कथेला मॉडर्न टच देत मनोरंजक बनवण्यात दिग्दर्शक मुदस्सर अजीज यशस्वी ठरले. त्यानंतर आता 'पती पत्नी और वो-२ ची घोषणा करण्यात आली. मात्र, यामधून कार्तिकचा पत्ता कट झाला असून त्याच्याजागी आयुष्यमान खुरानाची वर्णी लागली आहे. त्यात आता या चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, 'पती पत्नी और वो' च्या सीक्वलमध्ये आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि सारा अली खान हे नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, हिंदी सिनेविश्वात या चित्रपटाची चर्चा असतानाच या प्रोजेक्टमध्ये आणखी एका बॉलिवूड सुंदरची एन्ट्री झाली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'पती पत्नी और वो-२' मध्ये रकुल प्रीत सिंग देखील दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आयुषमान या तीन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या निर्माते या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत आहेत आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरु करण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे.'पती पत्नी और वो' मध्ये कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेची प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय, चित्रपटात कृती सॅननचा कॅमिओ होता आणि राजपाल यादव, अपारशक्ती खुराणा, सनी सिंग, डेझी बोपन्ना आणि दिया मिर्झा यांसारख्या कलाकारांनीही उत्तम काम केलं.