Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंहचा पाय पकडून हे काय करू लागली राखी सावंत? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:07 IST

रणवीर सिंहला पाहून राखी सावंत अत्यंत खुश झाली होती. यावेळी दोघांनी 'गोलियों की रासलीला राम-लीला'मधील 'तातार-तातार' गाण्यावर जबरदस्त डान्सही केला.

नवी दिल्ली - रणवीर सिंह आणि राखी सावंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोन्ही स्टार्स जबरदस्त मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी, या दोघांनीही कॅमेऱ्यासमोर दिलेल्या पोज पाहून, लोकही थक्क होत आहेत.

निमित्त होते अवॉर्ड शोचे -खरे तर, मुंबई येथे नुकतेच ITA-2022 पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजन जगतापर्यंतचे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी रेड कार्पेटवर राखी सावंत आणि रणवीर सिंह यांची भेट झाली.

सोबत डान्सदेखील केला - रणवीर सिंहला पाहून राखी सावंत अत्यंत खुश झाली होती. यावेळी दोघांनी 'गोलियों की रासलीला राम-लीला'मधील 'तातार-तातार' गाण्यावर जबरदस्त डान्सही केला.

असा होता दोघांचा लुक -यावेळी रणवीर सिंह आणि राखी सावंत नेहमीप्रमाणेच पेहराव करून आले होते. रणविर सिंहने काळ्या रंगाचा कोट आणि पँट घातलेली होती. कोटाच्या एका बाजूची बाही पांढऱ्या रंगाची होती. याच बरोबर त्याने पांढऱ्या रंगाचा गॉगलही लावलेला होता. तर राखी सावंतने काळ्या टाइट्स सह डीप नेक ब्रालेट आणि वरून एक जॅकेट घातलेले होते. विशेष म्हणजे, राखीच्या ड्रेसपेक्षा तिच्या डोक्यावरील गुलाबाच्या फुलाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कॅमेऱ्यासमोर देऊ लागले अशी पोज - डान्स केल्यानंतर या दोन्ही स्टार्सनी कॅमेऱ्यासमोर जोरदार पोज द्यायला सुरुवात केली. पोज देताना रणवीर सिंगने अचानक आपला एक पाय उचलला, जो राखी सावंतने पकडला आणि कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समध्ये पोज देऊ लागले.

टॅग्स :राखी सावंतरणवीर सिंगसेलिब्रिटीबॉलिवूड