Actress Mumtaz: हिंदी चित्रपटसृष्टीतील ७० ते ८० चं दशक आपल्या जबरदस्त अभिनय व नृत्यशैलीच्या जोरावर गाजविणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री मुमताज. तेरे मेरे सपने, रोटी असे त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले.मुमताजने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. त्या चित्रपटाचे नाव 'राम और श्याम' होतं. मात्र, एकीकडे यशाच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९७४ मध्ये त्यांनी गुजराती उद्योजक मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं.
ममुताज यांनी आंतरधर्मीय लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी इंडस्ट्रीपासून लांब राहणं पसंत केलं.त्यामुळे त्यावेळी त्याची बरीच चर्चा झाली होती. अशातच मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा निर्णय का घेतला होता, यावर वक्तव्य केलं आहे.विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या,, “माझ्याकडे त्यावेळी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझी आई, आजी आणि काकूंनी हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला.त्यांना त्या कुटुंबाबद्दल माहित होतं आणि त्यांनी मला लग्न करून संसार करण्याचा सल्ला दिला.”
मुलाखतीत पुढे मग मुमताज म्हणाल्या, “आमच्या कुटुंबातील कोणीही हिंदू आणि मुस्लिम भेदभाव केला नाही. या विचारसरणीला त्यांचा विरोध होता. माझ्या बहिणीनेही हिंदू व्यक्तीशी लग्न केलं आहे. रणधावा जी यांच्यासोबत तिने लग्न केलंय.” गुजराती उद्योजक मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नाच्या निर्णयाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, “माझं त्याच्यासोबतचं लग्न होणं हे नशीबात होतं.आणि मी माझ्या कुटुंबाच्या सल्ल्याचे तो निर्णय घेतला. मी पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबातून आले आहे. इराणी लोक असेच असतात.” असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
Web Summary : Mumtaz revealed she married Gujarati businessman Mayur Madhvani on her family's advice. She emphasized her family's lack of religious discrimination; her sister also married a Hindu man. Mumtaz stated it was her destiny.
Web Summary : मुमताज ने खुलासा किया कि उन्होंने अपने परिवार की सलाह पर गुजराती व्यवसायी मयूर माधवानी से शादी की। उन्होंने जोर देकर कहा कि उनके परिवार में धार्मिक भेदभाव नहीं था; उनकी बहन ने भी एक हिंदू व्यक्ति से शादी की। मुमताज ने कहा कि यह उनकी किस्मत में था।