बॉलिवूडमधून एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मेहरीन पिरझादा हिने गुपचूप लग्न केलं आहे. २६ एप्रिलला मेहरीनने लग्नाच्या बेडीत अडकत तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करत मेहरीनने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तिचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. मेहरीनच्या या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
मेहरीनने आयुष्यातील या खास क्षणासाठी अतिशय सुंदर असा लूक केला होता. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात ती नववधू नटली होती. खड्यांचे दागिने परिधान करत तिने साजश्रृंगार केला होता. तर तिचा पती अर्श यानेही गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. पारंपरिक पद्धतीने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मेहरीन आणि अर्श यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. श्रीनिधी शेट्टी, राहुल वैद्य, अनुराग कश्यप, काजल अग्रवाल या सेलिब्रिटींनी मेहरीनला तिच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मेहरीनने अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'राजा द ग्रेट', 'फन अँड फ्रस्ट्रेशन', 'एफ ३', 'डीएसपी देव', 'इंद्रा', 'फिलौरी', 'चाणक्य', 'स्पार्क' या सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. मेहरीन सोशल मीडियावरही सक्रिय असून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Web Summary : Actress Mehreen Pirzada secretly married Arsh on April 26th in a private ceremony. The couple shared photos on social media, revealing Mehreen in a pink lehenga and Arsh in a pink suit. Celebrities congratulated the couple. Mehreen has starred in several Bollywood and South Indian films.
Web Summary : अभिनेत्री मेहरीन पीरजादा ने 26 अप्रैल को चुपचाप अर्श से शादी कर ली। जोड़े ने सोशल मीडिया पर तस्वीरें साझा कीं, जिसमें मेहरीन गुलाबी लहंगे में और अर्श गुलाबी सूट में दिख रहे हैं। कई हस्तियों ने जोड़े को बधाई दी। मेहरीन ने कई बॉलीवुड और दक्षिण भारतीय फिल्मों में काम किया है।